एक तरफा प्यार की ताक़त ही कुछ और होती है! औरों के रिश्तों की तरह ये दो लोगों में नहीं बंटती! सिर्फ मेरा हक़ है इसपे! ए दिल है मुश्कीलमधला हा डायलॉग ऐकला की आपल्याला आठवतो तो अनुष्काच्या प्रेमात आकंठ बुडालेला रणवीर… मात्र त्याला प्रेमात आकंठ बुडालेला नायक म्हणायचं का नकार पचवता न आलेला, हरलेला नायक समजायचं…नकार न पचवता आलेले असे नायक,खलनायक डरपासून अनेक सिनेमांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले.
नकार… मुळात हा नकार आपल्याला लहानपणापासून ते आत्तापर्यंत अनेकदा ऐकायला मिळतो…मात्र त्याचा आणि तिचा नकार …तो मात्र पचवणं का जड जातं…लहानपणी कधी चॉकलेट, आईसक्रीमसाठी आई-वडीलांनी दिलेला नकार… तर आत्ता आत्ता पर्यंत इंटरव्ह्यूनंतर मिळालेला नकार असो…हे नकार आपल्याला स्विकारताना जड जात नाही. ते लगेच स्विकारून आपण मूव्ह ऑन होतो. मग फक्त तिचा किंवा त्याचा नकार का स्विकारता येत नाही. आपल्या आयुष्यात सहज कोणातरी येतं. ती-तो आपल्याला आवडायला लागतो. मात्र प्रत्येकाचे विचार, मतं, अपेक्षा, स्वप्न हे वेगवेगळे असतात… त्यामुळं समोरच्या कडूनही तिच अपेक्षा ठेवणं साफ चूकीचं आहे. आपली बाजू आपलं प्रेम व्यक्त करणं नक्कीच चूकीच नाही. उलट या गोष्टी मनात साठवून न ठेवता. न व्यक्त करता एखाद्याचा पाठलाग करणं. त्याला पाहत बसणं या सगळ्या कृतीतून विकृतीच जन्माला येतं…यापेक्षा भावना व्यक्त करणं केव्हाही चांगलं… समोरच्यानं देखील त्याच्या भावनांचा सन्मान राखावा…समोरच्याच्या मताचा आदरही राखावा. नकार स्विकारून पुढं जाणंचं महत्त्वाचं आहे. आणि तसं जमलं नाही तर… अशांनी मानसोपचारतज्ञ्जांची मदत घ्यायला संकोच बाळगू नये.पण समोरून आलेला नकार तितकाच हसत स्विकारावा…नाही आला तर त्याची अनेक उदाहरण आपण पाहतोच…एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्ला…एकतर्फी प्रेमातून असिड अटॅक या बातम्या दर दोन दिवसांनी वाचनात येतातच.

अनेक गुन्ह्यांमागे लपलेली ही मानसिकता…नकार न पचवण्याची…हे टाळण्यासाठी हसत नकार पचवणं हे गरजेचं नाही का ?